Ghatkopar Hording Case : दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Ghatkopar Hording Case : दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
ाटकोपर होर्डिंग प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात २०२०-२०२२ मध्ये होर्डिंगच्या परवानगीची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा आरोपी भावेश भिंडे व जान्हवी मराठे यांनी तत्कालिन पोलिस आयुक्त रविंद्र शेणगावकर यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान शेणगावकर यांनी ती जागा राज्य सरकारची असून होर्डिंगसाठी पालिका आणि राज्य सरकरचे ना हरकत प्रमाण पत्र आवश्यक असल्याचे सांगितलं होते. रेल्वेने कडून कंत्राटदारकांना काढण्यात आलल्या नियम व अटीतही तसा उल्लेख करण्यात आला होता. शेणगांवकर यांच्या बदलीनंतर कैसर खालिद यांची नियुक्ती त्या पदी झाली. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार खालिद आणि भावेश भिंडे हे एकमेकांच्या परिचयाचे असल्याचे म्हटले आहे खलिद यांनी पदभार स्विकारला त्यावेळी पहिल्याच दिवशी भिंडे हे खालिद यांना भेटायला गेल्याचाही आरोपपत्रात उल्लेख आहे