Ghatkopar Fire: घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण
Continues below advertisement
मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेकडील गोल्ड क्रेस्ट बिझनेस पार्क (Gold Crest Business Park) या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत आठव्या मजल्यावर अडकलेल्या सुमारे २५ ते ३० जणांना अग्निशमन दलाने (Fire Brigade) सुखरूप बाहेर काढले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'आम्ही आठव्या मजल्यावर अडकलो होतो, आम्हाला फायर ब्रिगेडच्या जवानांनी बाहेर काढले'. इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये आग लागली आणि तिचा धूर वरच्या मजल्यांपर्यंत पसरला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशन (Cooling Operation) सुरू आहे. घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू असून, आगीच्या धुराचे लोट अजूनही परिसरात दिसत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement