GDP in Countries : जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी येणार? International Monetary Fund चा इशारा
GDP in Countries : मागील दोन वर्षांत जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर काही देशांच्या अर्थव्यवस्था आता कुठे हळू हळू पूर्वपदावर येत आहेत. अशातच चिंता करणारी बातमी समोर आली आहे. 2023 मध्ये जगातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी दिलाय. लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचं प्रमाण आणखी वाढू शकते.. असं सांगण्यात येतंय... इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर पडली आहे.