Gutami Patil : तरुणांनांचा एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत गौतमीच्या कार्यक्रमात चांगलाच धुडगुस

लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा बदनामीकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही ती खचलेली नाही. पायात चाळ बांधून, नटूनथटून आणि पदर खोचून ती पुन्हा रंगमंचावर उभी राहिली. गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पहायला मिळतंय... आता खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्तानं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी तरुणाई गौतमीसमोर चांगलीच थिरकली... हा प्रकार इथंच थांबला नाही.. तर या कार्यक्रमात ग्रामीण डोंगराळ भागातील तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत कार्यक्रमात चांगलाच धुडगुस घातला... यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडल्याचं चित्र होतं... त्यामुळे गौतमीचा कार्यक्रम पुन्हा एकदा धुडगुसामुळे वादाच्या भोव-यात अडकला... यावेळी अखेर राजगुरुनगर पोलीसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला... मात्र, कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहिर करावं लागलं.... अखेर पोलिसांच्या मध्यस्तीनं वाद मिटला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola