Gautami Patil Ganpati Aarti : कोल्हापुरातील सावकार गणपती मंडळात गौतमीच्या हस्ते बाप्पांची आरती
Gautami Patil Ganpati Aarti : कोल्हापुरातील सावकार गणपती मंडळात गौतमीच्या हस्ते बाप्पांची आरती
संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे हे धोक्याचे ठरते. याच संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार पाडले, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे राजकारण हे शिवसेना (Shivsena Thackeray Camp) आमदारांचा आकडा कसा कमी होईल, यास खतपाणी घालणारे होते. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) तेच केले व आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार, हे निश्चित आहे, असे भाष्य ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तून करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहत नाही, हे फडणवीसांचे मत आहे. मुळात फडणवीस यांचे गुप्तहेर आणि राजकीय आकलन तोकडे पडत आहे. त्यांच्या छचोर चाणक्यगिरीचा बाजार उठल्याने त्यांचा गोंधळ उडाला आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे नाही, पण महाविकास आघाडीने एक चेहरा समोर आणावा, त्यास मी पाठिंबा देतो, असा खुला आवाज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेन्नीथला वगैरे प्रमुख नेत्यांमसोर दिला. हे करायला वाघाचे काळीज लागते. त्याबद्दल उद्धव ठाकरे कौतुकास पात्र आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे हे मविआचा मुख्यंत्रीपदाचा चेहरा नसतील अशी बासुंदी उधळत आहेत. त्यांचे गणित कच्चे आहे व निराशेने त्यांना ग्रासलेले आहे, हेच स्पष्ट आहे. स्वत:च्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.