Gautami Patil on Accident : चंद्रकांत पाटलांचा 'तो' व्हिडीओ पाहून गौतमी म्हणाली...

Continues below advertisement
पुण्यातील कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीन चिट दिली आहे. अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आपली काहीच चूक नसूनही खूप त्रास झाल्याची प्रतिक्रिया गौतमीने दिली. "मला खूप त्रास झालाय खूप म्हणून मी आज फेस केलंय ही गोष्ट की तुम्ही एखाद्याला म्हणजे किती त्रास द्यावा असं नसतं पहिलेपासून तात्काळपर्यंत मी ट्रोलच होतीये," असे ती म्हणाली. मंत्री चंद्रकांत पाटलांच्या एका व्हिडिओचा उल्लेख करत, 'गौतमी पाटीलला कधी उचलायचं?' या विधानावरही तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकारण्यांनी अशा प्रकरणात पडणे योग्य नसल्याचे तिने म्हटले. गाडी माझी असली तरी मी गाडीत नव्हते, तरीही मला दोष दिला जात आहे, असे गौतमीने सांगितले. तिने मदतीचा हात पुढे केला होता, पण तो स्वीकारला गेला नाही. या चार-पाच दिवसांत खूप त्रास सहन करावा लागल्याचे तिने नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola