Gauri Ganpati Visarjan : पवईत मगरींचं दर्शन, ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगा, विसर्जनात विघ्न

आज पाच दिवसाच्या गणेशाचं आणि गौरीचं विसर्जन झालं. मात्र हजारो गणेश विसर्जन होणाऱ्या पवई तलावांमध्ये मगर आढळून आल्यानंतर आता पालिका प्रशासनअधिक सतर्क झाले आहे. पालिका प्रशासनाकडून या परिसरामध्ये  बोटीच्या सहाय्याने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. तसेच वनविभागाला देखील पाचारण केले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत वनविभागाची एक टीम या परिसरात तैनात असणार आहे.तसेच तलावाच्या काठापर्यंत जाण्यास आणि पाण्यात उतरण्यास भाविकांना सक्त मनाई करण्यात आली आहे. याची खबरदारी देखील पालिका प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. काही वेळापूर्वी पवई तलावात जिथे विसर्जन होते तिथे एक भली मोठी मगर आढळून आली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola