Gauri Bhide : उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडेंबाबत धक्कादायक माहिती
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करून त्यांच्या संपत्तीची मागणी करणाऱ्या गौरी भिडे यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीये.. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांविरोधात याआधीच विविध दोन प्रकरणात खटले न्यायालयात दाखल असल्याचं कागदपत्रातून समोर आलंय.. मात्र आपल्या विरोधात कुठलाच खटला नसल्याचा दावा गौरी भिडे यांनी केलाय. एका बँकेने खाजगी कंपनीविरोधात दाखल केलेल्या याचिकेत कंपनीच्या संचालकासह गौरी भिडे यांचं नाव आहे... तर दुसऱ्या खटल्यामध्ये गौरी भिडे यांच्या वडिलांची मालकी असलेल्या प्रिंटिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे खात्यात न भरल्याचा आरोप आहे.