Gas Cylinder : घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त होण्याती शक्यता
Continues below advertisement
सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होण्याती शक्यता आहे. उद्यापासूनच हे नवे दर लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. एक तर आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी निवडणुका. डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तसंस एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदींची यंदा तिसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार महागाईबाबत कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नसल्याचं सूत्रांकडून कळतंय.
Continues below advertisement