Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक
Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक गणपतीपुळ्यात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांची पावलं समुद्रकिनारी वळत आहेत. त्यावेळी समुद्रात डुंबण्याचा आनंद भाविक घेत आहेत. दरम्यान, पावसाळ्यात समुद्राला उधाण असल्यामुळे समुद्रामध्ये प्रवेश करू नये काळजी घ्यावी असे सतर्कतेचे फलक किनारी लावण्यात आलेले आहेत. 'एबीपी माझा' देखील भाविकांना काळजी आणि सतर्कता बाळगण्याचा आवाहन करत आहे. गणपतीपुळेच्या याच समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतला आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी.. गारकी निमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा आहेत. दिवसभरामध्ये लाखो भाविक बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. गणपती बाप्पा मोरया असा नामघोष करत पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरात दिसून येते. होणारी गर्दी पाहता चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पावसाळा असला तरी भाविकांमधला उत्साह कायम आहे.