Gangubai Kathiawadi चित्रपटावर आता प्रदर्शनापूर्वीच वादाचे ढग ,कामाठीपुरा भागातील स्थानिकांचा विरोध

Continues below advertisement

 येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात  झळकण्यासाठी तयार असलेल्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटावर आता प्रदर्शनापूर्वीच वादाचे ढग जमू लागले आहेत. या चित्रपटाला कामाठीपुरा भागातील स्थानिक नागरिकांनी आता विरोध करायला सुरुवात केलेय. काल या नागरिकांनी हातात बॅनर घेत चित्रपटाचा निषेध करणारी घोषणाबाजी केलेय. कामाठीपुराचं ज्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलंय ते चुकीचं असल्याचा दावा या नागरिकांचा आहे. या भागातील ४२ गल्ल्यांपैकी फक्त ३ गल्ल्यांमध्येच देहविक्रयाचा व्यवसाय चालतो मात्र चित्रपटातील दृश्यांमुळे कामाठीपुरात राहणार्या नागरिकांची बदनामी होत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram