Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Continues below advertisement
गणेशोत्सवासाठी मुंबई आणि ठाण्यातील कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या जादा गाड्यांसाठी २२ जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के तिकीट दरात सवलत मिळेल, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जाईल. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या या नियोजनामुळे गणेशोत्सवातील प्रवास सुकर होईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement