Kokan Ganeshotsav Railway Reservation : गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी आजपासून रेल्वे बुकींग सुरु

Continues below advertisement

Kokan Ganeshotsav Railway Reservation : गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी आजपासून रेल्वे बुकींग सुरु मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासीयांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवार, ४ मे रोजी सुरू होणार आहे.  यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवसाआधी सुरू होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी धावणाऱ्या कोकणातील रेल्वेगाडीचे तिकीट ४ मेपासून काढता येणार आहे. गेल्या वर्षी तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांत प्रतीक्षा यादी हजारांपेक्षा अधिक होती. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची तिकिटे काढताना, प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली होती.  मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी हरतालिका आहे. त्या दिवशीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू होईल. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर तर गौरी विसर्जन १२ तर १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. तिकीट आरक्षण रेल्वे स्थानक किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून करता येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram