Ganeshostav | पर्यावरणपूरक देखावा, पर्यावरणपूरक बाप्पा, देखाव्यातून गणेश मंडळांच्या कार्याचा गौरव
एकीकडे कोरोना चे संकट तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यातून आलेला पूर यास्थितीत मुंबई ची गणेशोत्सव मंडळे नागरिकांच्या मदतीला धावून गेली होती.या मंडळांच्या कार्याचा गौरव म्हणून परळ गाव येथील रविंद चिटणीस यांच्या घरी विराजमान गणपती ची आरास या मंडळाची केली आहे.परळ, करीरोड सह मुंबई मधील ज्या मंडळांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे, त्यांच्या कार्याचा गौरव या डेकोरेशन मध्ये चिटणीस कुटुंबीयांनी केला आहे.हे पूर्ण डेकोरेशन पर्यावरण पूरक आणि गणपती ची मूर्ती ही पर्यावरण पूरक आहे.