Ganeshostav 2021 : रांगोळीतून लालबागच्या राजाचं दर्शन, गौरव माळी यांनी साकारलेली रांगोळी
नंदुरबार शहरातील रांगोळी कलाकार गौरव माळी याने 56 तासाच्या अथक परिश्रमाने लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिमा रांगोळी च्या साह्याने रेखाटले आहे. यासाठी गौरव याला दहा ते बारा किलो कलर रांगोळी लागले आहे. गौरवने या रांगोळी साठी गौरवने लेग कलर आणि पिगमेंट कलर यानाचा वापर केला आहे नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच एखाद्या रांगोळी कलाकाराने एवढी मोठी रांगोळी काढले असून गणेश उत्सव काळात काढलेल्या लाल बागचा राजा ची रांगोळी पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून ग्रामीण भागातील या रांगोळी कलाकाराने साकारलेली रांगोळी जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे