Ganesh Visarjan 2021 : नागपूरचा राजा, संस्थान गणपती, तुकाराम माळी मंडळ आणि आर.के.चांदीचा गणपती विसर्जित

Continues below advertisement

नागपूरचा राजाची मूर्ती विसर्जनासाठी काढण्यात आली आहे. तुळशीबाग परिसरात जयस्वाल कुटुंबियांच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेली 4 फुटी मूर्तीचे आज नागपूर जवळच्या कोराडी या ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. दरवर्षी नागपूरच्या राजा ची विसर्जनाची मिरवणूक नागपूरकरांसाठी आकर्षणाचा केंद्र असते. घोडे, उंट आणि अनेक बॅंड पथकांचा समावेश असलेली लांबच लांब मिरवणूक पाहण्यासाठी नागपूरकर तुळशीबाग परिसरासह ज्या ज्या भागातून ही विसर्जन मिरवणूक जाते त्या त्या ठिकाणी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने बाप्पांचा विसर्जन केलं जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram