Ganesh Visarjan 2020 | मुंबई-पुण्यातील विसर्जन यंदा कसं असणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीला मुंबईतील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं निर्णय घेतला आहे. परिणामी पण यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे.