Ganesh Naik Janta Darbar : वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यात पुन्हा जनता दरबार, महायुतीत राडा!
Continues below advertisement
वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार भरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे 'रावण' म्हणून टोला लगावण्यात आला होता. या टीकेला खासदार नरेश मस्केर आणि नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. या राजकीय शीतयुद्धानंतर आता पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांचा गडकरी रंगायतन येथे सकाळी दहा वाजता जनता दरबार पार पडणार आहे. या जनता दरबाराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाण्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वीही नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेतले आहेत, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement