Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive

Continues below advertisement

Gajanan Maharaj Palkhi Akola : पातूरच्या घाटातील गजानन महाराजांच्या पालखीचं विहंगम दृश्य Exclusive  अकोल्यात गजानन महाराजांच्या पालखीचं काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आल.. आजही पालखी अकोल्यात मुक्कामी असणार आहे... गजानन महाराजांच्या पालखीचे हे 55 वे वर्ष आहेय. यावर्षी पालखीत साडेसहाशेंवर  वारकऱ्यांचा समावेश आहेय. विशेष म्हणजे दरवर्षी सारखाच यावर्षीही वारीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. अकोल्यातील ड्रोन दृष्यांसह गजानन महाराजांच्या पालखीतील उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...  गजानन महाराजांच्या पालखीनं आज अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलाय. 13 जूनला शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीने नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूरमार्मागे वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश केलाय. या पालखीतील एक अतिशय महत्वाचा आणि सुंदर टप्पा म्हणजे पातूरचा घाट. संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील मेडशीत प्रवेश, पातूर घाटातून पालखी वाशिममध्ये दाखल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram