Gadchiroli Encounter : काल मारल्या गेलेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीत, आज शवविच्छेदन होणार

Continues below advertisement

गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून गडचिरोली पोलिसांच्या सी ६० पथकानं मोठी कामगिरी केलीय. त्यातही जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करून पोलिसांनी नक्षली चळवळीला मोठा हादरा दिलाय. छत्तीसगडच्या सीमेवरील मरदिनटोलाच्या घनदाट जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकानं काल ही कारवाई केली. त्यात दंडकारण्य भागातला आणखी एक नक्षलवादी नेता जोगन्नासुद्धा या चकमकीत ठार झाल्याची माहिती आहे. आज सकाळीही पोलिसांनी पुन्हा जंगलात ऑपरेशन सुरू केलंय. काल मारल्या गेलेल्या नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीत आणले असून त्यावर शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना दिले जातील, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram