Gadchiroli : ओदिशातून आलेल्या 18 हत्तींच्या कळपाकडून शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांवर हल्ला
Continues below advertisement
ओदिशा राज्यातील हत्तींचा एक कळप 4 दिवसांपूर्वी छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालाय. या कळपात 18 हत्ती आहेत. त्यात तीन पिल्लं आहेत. धानोऱ्याजवळ मुरुमगाव परिसरातील जंगलात सध्या या हत्तींचं वास्तव्य आहे. छत्तीसगडच्या राजनांदगाव परिसरातून हे हत्ती गडचिरोलीत दाखल झाले. काल रात्री हत्तीनं केलेल्या हल्ल्यात कन्हारटोला इथं अशोक मडावी हा शेतकरी जखमी झालाय. याशिवाय ते रात्री धानाच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतायत. याआधीही हत्ती गडचिरोलीत आले होते. पण नुकसान न करता परत गेले होते. यावेळी त्यांनी नुकसान करायला सुरुवात केल्यानं त्यांना परत पाठवण्याची व्युहरचना वनविभागाकडून सुरु आहे.
Continues below advertisement