Ahmednagar Corona Update | अहमदनगरमध्ये एकाच दिवशी 42 कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल एकाच दिवशी 2233 रुग्णांना कोरोना झाल्याची उच्चांकी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे मृत्यूचे प्रमाण देखील अधिक होते. एकाच दिवशी कोरोना रुग्णांचे 42 शव हे अहमदनगरमधील अमरधाम येथे अंत्यविधीसाठी आणले होते. अमरधाममधील 2 विद्युत दाहिनीत 20 आणि उरलेल्या मृतदेहांवर लाकडाच्या सरणावर शव रचून अंत्यसंस्कार करण्यात आले.