Sanjay Raut on CM Eknath Shinde : मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांना फोन जात नाहीत का?
मुख्यमंत्री कार्यालयावर केलेल्या आरोपाप्रकरणी आता संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी डीलिंग केलं जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून त्याची चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 7 कडून संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली आहे. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश क्राईम ब्रँचला दिले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना नोटिस पाठवण्यात आली असून केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितल्याची माहिती आहे.