BJP Free Chicken : मोफत कोंबडी वाटण्याबाबतचे बॅनर व्हायरल, कोंबडी आणण्यास गेलेल्या नागरिकांचा हिरमोड
Continues below advertisement
मांसाहारी लोकांची दिवाळी म्हणजे गटारी अमावस्या... याच अमावस्येची औचित्य साधत, मुंबईतील प्रभादेवी येथे, भाजपकडून मोफत कोंबडी वाटप, असे बॅनर लागले होते. या बॅनरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकजण कोंबडी आणण्यासाछी गेले असता, कोंबडी तर मिळाली नाहीच, उलट ते बॅनरही गायब झाले होते. त्यानंतर लोकांनी चौकशी केली असता, कुणीतरी खोडसाळपणा करत भाजपच्या नावे बॅनर लावल्याचं समोर आलंय. दरम्यान, खोट्या बॅनरमुळे कोंबडीही गेली आणि बॅनरही गायब अशी मजेदार चर्चा सुरू झालीय.
Continues below advertisement