बनावट अॅपच्या माध्यमातून फसवणूक, वसईतील बंटी- बबली अखेर अटकेत!
Continues below advertisement
बनावट ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या बंटी आणि बबलीला वसई पोलिसांनी अटक केली आहे. गुगल पे चे बनावट ॲप बनवून हे जोडपं वसई-विरार परिसरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये तसेच पेट्रोल पंपावर जाऊन व्यवहार करायचे. खरेदी झाल्यानंतर पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी या बनावट ॲपचा उपयोग करत होते. समोर हॉटेल मालकाला पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज ही हे दाखवत होते. माञ अखेर हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या मदतीने यांची रवानगी तुरुंगात झाली आहे.
Continues below advertisement