Fraud Case: 'दानवेंच्या सांगण्यावरून भागीदारी दिली', माजी मंत्री Raosaheb Danve यांच्या नातवावर गुन्हा.
Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नातू शिवम पाटील (Shivam Patil) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून भागीदारी दिली', असा थेट आरोप तक्रारदार आणि भाजप पदाधिकारी कैलास अहिर (Kailas Ahir) यांनी केला आहे. या प्रकरणी शिवम पाटीलसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी देऊनही ठरलेली रक्कम परत न केल्याने फसवणूक झाल्याचा दावा कैलास अहिर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. खुद्द भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने दानवे कुटुंबातील सदस्यावर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement