NCP Corporators Joins Shiv Sena | आमदार संदीप क्षीरसागर यांना झटका, राष्ट्रवादीचे चार आमदार शिवसेनेत
काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाची किनार असलेल्या बीड जिल्ह्यातील चार नगरसेवकांनी पुतण्याला रामराम ठोकून काकाचे नेतृत्व मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे चार नगरसेवक आता जयदत्त क्षीरसागर गटामध्ये सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक शिवसेनेमध्ये गेला होता आता चार नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून गेल्याने पुतण्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.