देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी साबणे यांना भाजपकडून उमेदवारी? सेना सोडताना साबणेंच्या डोळ्यात पाणी

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यावर असणारे देवेंद्र फडणवीस यांची देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक उमेदवारी संदर्भात नायगाव - नरसी येथे भेट घेतलीय. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपावाशी होणार हे निश्चित झालंय. महाविकास आघाडीचे नेते तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीमुळे व शिवसेनेला विश्वासात घेतल्या जात नसल्यामुळे शिवसेना सोडून भाजपात जात असल्याचे त्यांनी म्हटलंय.

त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण युती धर्म पाळत नाहीत व आम्ही काँग्रेसला मतदान करत नाही म्हणून मी भजपात जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या भाजपात प्रवेश करून देगलूर बिलोली निवडणुकीसाठी निवडणूक रिंगगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola