Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ? निकटवर्तीय संजय पुनुमियांविरोधात गुन्हा ABP Majha
Continues below advertisement
Parambir Singh Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुनुमिया यांनी समृद्धी महामार्गालगत जमिनी लाटल्याचा संशय आहे आणि या जमीन खरेदीशी परमबीर सिंह यांचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत. संजय पुनुमिया सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सिन्नर पोलीस त्यांचा ताबा घेऊन जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Parambir Singh