Uddhav Thackeray On Eknath shinde : ते नरकासूर, एकनाथ शिंदे गटाला पुन्हा ठाकरेंनी सुनावलं
Continues below advertisement
नाशिकमधील (Nashik) भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) यांनी आज शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. 'आज नरक चतुर्दशी असून, कृष्णाने नरकासूराचा वध केला, नरकासूर कोण हे वेगळं सांगायची गरज नाही', असे उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रावरील भाजपचे नरकासूराचे संकट संपवायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. जे मतचोरी करून सत्तेत बसले आहेत, त्यांची चोरी चोरांसकट पकडली आहे आणि या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत, असेही ठाकरे म्हणाले. गायकवाड यांचा पक्षप्रवेश हा आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement