Threat Letter: माजी खासदार Navneet Rana यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Continues below advertisement
माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्पीड पोस्टद्वारे जावेद नावाच्या व्यक्तीनं राणा यांना अश्लील पत्राद्वारे धमकावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राणा यांच्या स्वीय सहाय्यकाने राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वीच हैदराबादमधून (Hyderabad) आलेल्या एका धमकीनंतर हे दुसरे धमकीचे पत्र आहे. ताज्या धमकीच्या पत्रात तपशिलाच्या आधारावर 'अब्दुल' नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement