Shivajirao Kardile : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे निधन, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त
Continues below advertisement
राहुरीचे भाजप आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करताना त्यांच्या शेवटच्या भेटीची आठवण सांगितली, 'शिवाजीराव जरा तब्बेतीकडे पहिलं लक्ष द्या. चेहरा जरा पुसपांढरा झालेला मला दिसतोय, असे मी त्यांना म्हणालो होतो'. कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अहमदनगरजवळील बुऱ्हाणनगर गावचे सरपंच म्हणून केली. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा विविध पक्षांमधून काम केले. ते २००९, २०१४ आणि २०२४ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये मात्र त्यांचा प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव झाला होता. कर्डिले हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement