ABP News

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Continues below advertisement
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.   माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी.  सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram