Madhav Godbole : माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Apr 2022 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMadhav Godbole : भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खंबीर प्रशासकीय अधिकारी आणि लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने प्रशासनावर हातखंडा असणारा, संवेदनशील अधिकारी, परखड भाष्य करणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.