Anil Deshmukh Case : 14 एप्रिलला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी, सूत्रांची माहिती
मुंबई : कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. 14 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.