Maharashtra Politics नाशकात BJP ला धक्का, संगीता गायकवाड 'मातोश्री'वर, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) दिवाळीच्या मुहूर्तावर भाजपाला (BJP) मोठा धक्का बसला आहे, पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'मतचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा निशाणा साधलाय'. मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. संगीता गायकवाड यांच्यासोबत त्यांचे पती हेमंत गायकवाड आणि अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये नवी उभारी मिळेल, असे मानले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement