Mahadev Jankar : रासपचा मुख्यमंत्री कसा होईल याकडे लक्ष- महादेव जानकर ABP Majha

यंदा दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबतर अजूनही स्पष्टता झाली नाही, मात्र दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ घरगुती प्रश्न आहे, त्याबाबत मी बोलू शकत नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी बदलापुरात दिलीय. मात्र माझ्या पक्षाचे आमदार कसे वाढतील आणि माझा मुख्यमंत्री कसा होईल याकडे माझ लक्ष असल्याचं जानकर यांनी सांगितले. शिवाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल असे देखील त्यांनी सांगितल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola