
Subhash Desai : एफएम वाहिन्यांनी प्राईम टाईममध्ये मराठी भाषेला प्रधान्य द्यावं : मंत्री सूभाष देसाईं
Continues below advertisement
प्राईम टाईममध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्यावं, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी एफएम वाहिन्यांना दिल्या आहेत. तसंच मुंबईच्या रेडिओवरील कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.. नुकतिच दृकश्राव्य माध्यमातील प्रतिनिधींशी सुभाष देसाई यांनी बैठक घेतली.. या वेळी माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंतही उपस्थित होते. या बैठकीत सुभाष देसाईंनी या सूचना दिल्या. विविध एफएम वाहिन्यांवर मराठी कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. तसंच हिंदी आणि इंग्रजीतील कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. याची सूभाष देसाईंनी गांभीर्याने दखल घेतली आहे. तसंच खासगी रेडिओंनी किमान २ तास मराठीत कार्यक्रम प्रसारित करावेत, अंसही सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे...
Continues below advertisement