Flood Relief | पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खंडोबा देवस्थानाचा मदतीचा हात
Continues below advertisement
भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान अणदूर मयलारपूर नळदुर्ग देवस्थान समितीनं पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भूम तालुक्यातील सोनगिरी वस्ती, साबळेवाडी आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. इथले अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. या पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीनं शिधा कीट वाटपाचा उपक्रम राबवला. या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल पाकिट, साखर आणि बेसन अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. ही मदत पूरग्रस्त नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement