Flag hoisting By PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावार ध्वजावंदन : ABP Majha

भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. 

पंतप्रधानांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून स्वागत, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाकडून गार्ड ऑफ ऑनर. 

पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांवर वायूसेनेच्या लढाऊ हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी, स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुमारे सहा हजार निमंत्रित उपस्थित.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, अभिवादन करत केलं पुष्पअर्पण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola