पाच जिल्हापरिषद निवडणुकांविरोधात लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार, ओबीसी समाजाचा आक्रमक पवित्रा
मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर येथील जिल्हापरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच आता ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात सभा, प्रचार करण्यास बंदी आहे. शाळा, कॉलेज बंद आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका कशा काय घेता असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. जर अशा काळात निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नागरिकांचे मृत्यू झाले तर सरकारविरोधात आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
Tags :
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule Prakash Shendge Obc Reservation OBC Protest Devendra Fadnavis