Biodiversity Threat: 'लोणार सरोवराचं अस्तित्व धोक्यात,' सांडपाण्यामुळे pH बदलला, मासे आढळल्याने खळबळ
Continues below advertisement
बुलडाण्यातील लोणार सरोवरात (Lonar Lake) मासे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सांडपाणी सरोवरात सोडल्याने आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरोवराच्या पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. 'लोणार सरोवराचं अस्तित्व ते बऱ्याचप्रमाणे धोक्यात आलेलं आहे, आणखी धोक्यात येऊ नये,' अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. उल्कापातामुळे तयार झालेल्या या सरोवरातील पाणी अत्यंत अल्कधर्मी (Alkaline) असून त्याचा pH साधारणपणे १०.५ असतो, ज्यामुळे त्यात सजीवसृष्टी आढळत नाही. मात्र, आता मासे आढळून आल्याने आणि पाण्याच्या pH मध्ये बदल झाल्याने सरोवराची अद्वितीय जैवविविधता धोक्यात आली आहे. यासोबतच, परिसरातील प्राचीन कमलजा माता मंदिराच्या (Kamalja Mata Temple) गाभाऱ्यातही पाणी शिरल्याने चिंता वाढली आहे. शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement