सिंधुदुर्गातून देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी पुण्याला रवाना, पेटीला 18 हजाराचा दर
Hapus Mango : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथून पुण्याला रवाना झाली आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात मोहोर टिकवून त्यातून फळांच्या उत्तम व्यवस्थापन करत आंब्याच्या फळांचं संरक्षण करीत मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी पहिली देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठविली आहे. पाच पाच डझनच्या दोन पेट्या पुण्याला पाठवल्या असून त्या पेट्यांची विक्री झाली असून प्रतिपेटी १८ हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे. या हंगामातील पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यानी मिळवला असून कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा हा तिसऱ्यांदा मान मिळविला आहे.