पालघरमध्ये राज्यातील पहिला बाईक ॲम्बुलन्सचा प्रयोग,अतिदुर्गम भागातील रुग्ण, गरोदर महिलांसाठी उपयोगी
अलर्ट सिटीझन फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज पालघर जिल्ह्यासाठी दोन बाईक ॲम्बुलन्स देण्यात आल्या असून पुढील कालावधीत आणखीन 23 बाईक ॲम्बुलन्स देण्याचा मानस अलर्ट सिटीझन फोरम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सांगण्यात आलंय . पालघर मधील ग्रामीण भागातील रहदारीला येणाऱ्या अडचणीतचा विचार करून या बाईक ॲम्बुलन्स देण्यात आल्या आहेत.