Firecracker Blast | सांगलीच्या Tasgaon मध्ये भीषण स्फोट, 8 जखमी, 2 गंभीर
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकन येथे दसऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शोभेच्या दारूची चाचणी सुरू असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दसऱ्यानिमित्त फटाक्यांची आणि शोभेच्या दारूची आतशबाजी करण्याची तयारी सुरू होती. ही चाचणी करत असताना अचानक स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. जखमी झालेल्यांवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.