Aundha Nagnath Temple Palkhi Sohala | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांविरुद्ध गुन्हा
दसऱ्याच्या दिवशी कोरोनामुळं तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल असे वाटले होते. मात्र ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले. या प्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंपरागत पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथाची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. दरवर्षी या पालखीमध्ये मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री , पंचक्रोशीतील भक्तांची उपस्थिती असते मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोनं लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.