ABP News

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित?

Continues below advertisement

अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले....उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले..इथवर शिंदे गटातले मंत्री, आमदार, नेत्यांच्या पचनी पडलं... पण आता घोडं अडलं होतं ते अर्थखात्यावरुन... पण कालच्या दिल्लीतल्या अमित शाहांच्या भेटीनंतर अर्थखात्यावरचा तिढा सुटल्याचं कळतंय... उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीए... इतकंच नाही तर अर्थखात्यासोबत सहकार खातंही अजित पवारांना मिळाल्याचं कळतंय...  त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळतेय... याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय.. दरम्यान यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय...त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिंदे गटाची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram