Yash Deshmukh | शहीद जवान यश देशमुख यांना अखेरचा निरोप, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते', अशी प्रतिक्रिया शहीद जवान यश देशमुखचे वडील दिगंबर देशमुख यांनी दिली आहे. जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
Tags :
Jalgaon Jawan Jalgaon Jawan Martyred Jammu And Kashmir Martyred Yash Deshmukh Srinagar Terrorist Attack