Gate Way Of India Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gate Way Of India Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवास होते. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते. त्यामुळे या घटनेत जीवितहानी होण्याची भीती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली. JOC येथून प्राप्त माहितीनुसार एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू असल्याची माहिती समोर आली आहे.
बचावकार्य सुरु असल्याची माहिती
ही बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, ही बोट बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आजुबाजूच्या बोटींनी तात्काळ घटनास्थळी जात बचावकार्य सुरु केले. ताज्या माहितीनुसार, नीलकमल बोट ही समुद्रात पूर्णपणे बुडाली आहे. आता प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.