स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडेची ओपीडी पुन्हा सुरु, आरोग्य विभागाचा छापा
स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर आल्यानंतरही बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू ठेवला. परळीजवळ सुदाम मुंडेचा हा दवाखाना सुरू होता. ही माहिती मिळताच बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आरोग्य विभागाने या बेकायदेशीर दवाखान्यावर छापा टाकला. जवळपास 6 ते 7 सात आरोग्य विभागाचं हे ऑपरेशन सुरु होतं अशी माहिती आहे.